लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

निवेदनानंतर बिर्‍हाड यात्रा निघाली मुंबईला

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : प्रतापसिंहनगर येथील दत्ता जाधव, युवराज जाधव यांच्यासह सुमारे अकरा जणांची घरे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जमिनदोस्त केली. या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्याच्या दिशेने प्रतापसिंहनगर येथून लहुजी शक्तीचे सेनेच्यावतीने बिर्‍हाड यात्रा निघाली आहे. त्या यात्रेपुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, विविध घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्यासह तब्बल 20 कर्मचारी यावेळी बंदोबस्ताला होते. निवेदन दिल्यानंतर लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, आमचा लढा हा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे. शनिवार, दि. 12 रोजी आयुक्त कार्यालयाबाहेर मुक्काम असणार आहे. तेथून पुढे वर्षा बंगल्यावर 18 तारखेला पोहचणार आहोत. आमचा लढा हा इथल्या अधिकार्‍यांच्या विरोधात राहणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इस्रायलला नकाशावरुन मिटविण्यासाठी इराण या देशाची भेट घेणार
पुढील बातमी
कॉंग्रेस पदाधिकार्‍याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे

संबंधित बातम्या