सातारा : सातारा शहर परिसरात लक्ष्मी टेकडी व बोगदा परिसर येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांकडून 1920 रुपयाच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत .
याप्रकरणी विनोद विठ्ठल भांडवलकर (वय 44 रा. लक्ष्मी टेकडी सदरबाजार) व अर्जुन शशिकांत अवघडे (वय 40 रा. आकाशवाणी झोपडपट्टी) यांना बीएन एसएस 35 प्रमाणे नोटीस बजविण्यात आली आहे. भांडवलकर याच्याकडून 960 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या 90 तर अवघडे यांच्याकडून 180 ml च्या बारा बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस स्टेशनचे हवालदार वैभव शंकर माने यांनी ही कारवाई केली आहे.