भंडारा : रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या धान्याचा दर्जा सुधारावा आणि गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये मिळणारे धान्य, त्याची साठवणूक आणि स्वच्छतेची झाडाझडती आता थेट 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे.
रेशनच्या धान्यामध्ये भेसळ असणे किंवा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणे अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून सतत नोंदवल्या जातात. चांगल्या दर्जाचे धान्य काळ्या बाजारात विकून ग्राहकांना खराब धान्य दिले जात असल्याचा आरोपही होतो.
धान्यात उंदरांच्या लेंड्या, कधी दगड, कधी किडे!
रेशनवरून मिळणाऱ्या धान्याबाबत लाभार्थ्यांकडून नेहमीच गंभीर तक्रारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे प्राप्त होत असतात. कित्येकदा तांदूळ आणि गव्हामध्ये उंदरांच्या लेंड्या, बारीक खडे आणि किडे आढळून येतात. असे खराब धान्य आरोग्यासाठी धोकादायक असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र असंतोष पाहायला मिळतो.
कोंदट आणि अस्वच्छ वातावरणात साठवणूक
जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानांमध्ये धान्य साठवण्यासाठी योग्य आणि हवेशीर जागाच उपलब्ध नाही. अतिशय कोंदट, दमट आणि अस्वच्छ वातावरणात धान्याची पोती रचून ठेवली जातात. त्यामुळे धान्याला बुरशी लागणे, कीड पडणे आणि ते खाण्यायोग्य न राहणे असे प्रकार घडतात.
दुकानांनाही 'एफएसएसआय' परवाना सक्तीचा
सामान्य अन्नपदार्थ विक्रेत्यांप्रमाणेच आता रेशन दुकानांनाही 'एफएसएसएआय' (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) चा परवाना घेणे बंधनकारक केले जाऊ शकते.
खराब धान्य आरोग्यासाठी धोकादायक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, दुकानांनाही 'एफएसएसआय' परवाना सक्तीचा
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
मेडिकल कॉलेजच्या रोजगारात भूमिपुत्रांना संधी देणार
September 10, 2026
धनगरवाडीत घराबाहेर लावलेली दुचाकी गायब; सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद
September 09, 2026