सातारा : थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेले महाबळेश्वर गारठले आहे. थंडीचा कडाका या पर्यटन स्थळाची नजाकत आणखी खुलवत आहे. जोरदार वार्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 11 अंश नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी खाली येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला आहे. शहरी भागापेक्षा सभोवतालच्या भागात थंडीच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक, लिंगमाळा परिसरामध्ये तापमानात घट होताना दिसत आहेत. शहरालगतचे ढाबे, हॉटेलच्या बाहेर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तसेच उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात लाट येण्याची शक्यता असल्याने आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे आहेत याची खात्री करावी. ३. प्रसार माध्यमाव्दारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचना अमलात आण्याव्यात. एकटे रा-हणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष दयावे. गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या खोलीमध्ये वास्तव्य करावे. रूम हिटर चा वापर करावा. गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे.