सातारा : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि बैलगाड्या यांच्या मागे व पुढे उच्च दर्जाचे रिफ्लेक्टीव्ह (स्टिकर) लावले नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिफ्लेक्टीव्ह लावणार नाहीत अशा वाहनांना व बैलगाड्यांना सर्व रस्त्यांवर आणि सर्व परिसरामध्ये (साखर कारखान्यात ) जाण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.