नटखट करंडक बालनाट्य स्पर्धेमध्ये अभिरुची कोल्हापूर संस्थेचे 'ठोंब्या'ने बाजी मारली

by Team Satara Today | published on : 02 February 2026


सातारा : कल्याणी ग्रुप व सातारा नगरपरिषद आयोजित नटखट करंडक बालनाट्य स्पर्धा 2026 नुकतीच शाहू कलामंदिर येथे बालगोपाळांच्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. अभिरुची कोल्हापूर या संस्थेचे ठोंब्या हे बालनाट्य यंदाचे विजेते ठरले. 

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - सर्वोत्कृष्ट एकांकिका सांघिक : ठोंब्या - प्रथम  (अभिरुची, कोल्हापूर),  कठपुतली - द्वितीय  (स्वच्छंद, पुणे), गोष्टीची गोष्ट - तृतीय  (कला संस्कृती कला वेदक संस्था, कल्याण) चिंगी - चतुर्थ (निर्मानम् आर्ट हाऊस, पुणे), चेटकिणीच्या बंगल्यात - पाचवी (अलंकार कलाकादमी, कोल्हापूर).   

उत्कृष्ट दिग्दर्शन - जितेंद्र देशपांडे - प्रथम (ठोंब्या), अमृता जोगदेव, मुग्धा वडके  - द्वितीय (कठपुतली), विजय घुले - तृतीय (गोष्टीची गोष्ट). सर्वोत्कृष्ट अभिनेता - आरव गुळवणी - प्रथम (ठोंब्या), अर्णव तौर - द्वितीय (जनावर), अर्चिस थत्ते - तृतीय (कठपुतली), हर्षल वाळिंबे - चतुर्थ (टाइम ट्रॅव्हल) श्रेयस अनिल दळवी - पाचवा (चिंगी).  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आरोही गुळवणी - प्रथम (चेटकिणीच्या बंगल्यात), जिज्ञासा महाजन - द्वितीय (चिंगी) अनघा भागवत - तृतीय (गोष्टीची गोष्ट), भूमी पाटील - चतुर्थ (ठोंब्या), आराध्या भोसले - पाचवी (ऐलमा पैलमा गणेश देवा). 

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - मयुरेश मोडक - प्रथम (गोष्टीची गोष्ट), प्रणव भुरे - द्वितीय (कठपुतली), युसुफ शेख  - तृतीय (चिंगी). सर्वोत्कृष्ट नेपथ्य - आदिती गोसावी, नीलिमा कुलकर्णी - प्रथम (सर्कस), महेश सोनुले, ओमकार पाटील - द्वितीय (चेटकिणीच्या बंगल्यात), आशिष पवार - तृतीय (सुखी सदऱ्याचा शोध)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत  - विकास गुळवणी, विजय पाठक - प्रथम (ठोंब्या),  अमृता जोगदेव, पार्थ कोकीळ - द्वितीय (कठपुतली),  सुमित वर्णे - तृतीय (चेटकिणीच्या बंगल्यात). सर्वोत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा - मानसी कोकीळ, चिन्मयी कुलकर्णी - प्रथम (कठपुतली), दीपक कुंभार, रश्मी घुले - द्वितीय (गोष्टीची गोष्ट), अश्विनी गाडेकर, सचिन थोरात - तृतीय (सर्कस) बक्षीस विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक व सन्मान चिन्ह देण्यात आले. 

लक्षवेधी अभिनय उत्तेजनार्थ (फक्त प्रशस्तिपत्र) - समर्थ कुलकर्णी (सर्कस),  ओम घंटी (सदाबहार), देवदत्त घोणे (जिनी आणि पेन), वेदांत महाडिक (निबंध), लाभ विजय घुले (सुखी सदऱ्याचा शोध), रियान लोहकरे (म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे), आरुष गायकवाड (व्हाट्सअपचा तमाशा), आरुषी पाटणकर (सत्याची गोष्ट), स्वरांश लेले (मधुरा), मीरा आडकर (एआयजी), अद्विक शेवलकर (हाऊ डेअर यु), कश्वी माकोडे (हाऊ डेअर यु)

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय हळदीकर आणि वर्षा चौगुले या मान्यवरांनी काम पाहिले. दत्ताजी थोरात, सागर पावसे, किरण पाटील,  महेश पागडे आणि कल्याण राक्षे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुजित जाधव, स्पर्धे विषयीचे मनोगत कल्याण राक्षे , निकालवाचन संदीप जंगम यांनी केले तर आभार नितीन देशमाने यांनी मानले 

रवीना गोगावले, हेरंब जोशी, धोंडीबा कारंडे, इमरान मोमीन, रोहित ढेबे, चैतन्य पाटेकर, प्रसाद नारकर, प्रसाद देवळेकर, प्रशांत इंगवले, प्रकाश बोधे, मनोज जाधव, धैर्यशील उतेकर, जमीर आतार, गजानन वाडेकर, दीपक देशमुख, निळकंठ साळुंखे, उदय जगताप, अक्षय घाडगे, केतन मोहिते,  बाळकृष्ण शिंदे या रंगकर्मीनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते,  उपनगराध्यक्ष दत्ता बनकर,  मुख्याधिकारी अभिजीत बापट, तुषार भद्रे, अमित कुलकर्णी, राजेश मोरे, बाळासाहेब खरात, मंगेश वाडेकर, अमित पवार, राजू गोरे या मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुशांत मोरे यांच्या 'गायरान वाचवा' मोहिमेला यश ; १३२३ एकर पैकी ५० टक्के जमीन पुन्हा ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय
पुढील बातमी
साताऱ्यातील वाढत्या अतिक्रमणांचे नगराध्यक्षांकडे गाऱ्हाणे; सतर्क सातारकरांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट :अतिक्रमण हटावचे धोरण ठरणार

संबंधित बातम्या