सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 July 2026


सातारा : सातारा शहरातील एस.टी. स्टँड ते पोवई नाका जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर भररस्त्यात एका ऑटोचालकाने रिक्षा एका चाकावर उचलून धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रकांत महेंद्र भिसे (वय 21, रा. खेड, बौद्ध वस्ती, ता. सातारा) याने दि. 15 जुलै रोजी रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास सेव्हन स्टारसमोर ऑटो रिक्षा (एमएच-11-सीजे-3129) सार्वजनिक रस्त्यावर एका चाकावर उचलून स्टंट केला. तसेच वाहन वेडीवाकडी व बेदरकारपणे चालवत स्वत:सह इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी वाहतूक नियमन शाखेच्या पोलीस कर्मचारी भाग्यश्री जाधव (वय - 34) यांच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर 20 रोजी धरणे आंदोलन; आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
पुढील बातमी
प्रतापसिंहनगरमध्ये चोरट्याने जबरदस्तीने मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना; अज्ञाताविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या