सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश उर्फ गुड्ड्या ज्ञानेश्वर कापसे रा. कोडोली, सातारा याला सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो दि. 31 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झेडपी चौक परिसरात आदेशाचा भंग करून वावरत असताना आढळून आला.
दुसऱ्या कारवाईत, अनिकेत वसंत पाटणकर रा. चंदन नगर, कोडोली, सातारा हा दि. 31 रोजी दुपारी तीन वाजता हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून झेडपी चौक परिसरात आढळून आला. या दोघांवरही हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.