सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, (जेमसेफ) सातारा संस्थेच्या समाजभूषण- दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर सातारा या प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी नक्ष कांतीलाल पटेल याने मंथन परीक्षा 2025 मध्ये राज्यात दहावा क्रमांक पटकावला. त्याला परीक्षेसाठी इ. तिसरीच्या वर्गशिक्षिका कु.प्रतिभा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या व शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव मा. श्री संजीव माने तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मा. श्री अमोल काटे यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.
मंथन परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवून शाळेचा व संस्थेचा नावलौकिक वाढवला ,त्याबद्दल दोघांचे संस्थेचे संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटी, माता -पालक संघ ,परिवहन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य , पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.