सातारा : प्रतापसिंहनगरात महिलांना मारहाण, जबरी चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये सुमारे 17 ते 18 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड येथील प्रतापसिंहनगरात दोन मुलींचे कपडे फाडून, त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न सुमारे 17 ते 18 जणांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यास आलेल्या महिलांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करत, तसेच कोयत्यांनी हातावर, पाठीवर, डोक्यात वार केले. महिलांचे मंगळसूत्र व दागिनेही लंपास केले. हा प्रकार दि. 23 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास घडला.
सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली असून, विक्रम आश्रू वाघमारे, नेताजी तानाजी बोकेफोडे, सागर शिंदे, संग्राम ऊर्फ माऊली बोकेफोडे, अमर बनसोडे, रामा साठे, रवी सोनावणे, दीपक ऊर्फ लाला साळवी, तानाजी बोकेफोडे, अंगत वाघमारे, यश निकम, मनोज बनसोडे, सदानंद साळवे, विजय ऊर्फ भेज्या वाघमारे (सर्व रा. प्रतापसिंहनगर) यांच्यासह अन्य 4 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत.