सातारा : तालुक्यातील मानेवाडी अंबवडे खुर्द गावच्या हद्दीत पोगरवाडी रस्त्याच्या कडेला हॉटेल रानसावली येथे हॉटेल मालक संजय अर्जुन गुजर (वय ५४,रा. अंबवडे) यांनी दि ३० डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मद्यपी ग्राहकांना मद्य सेवन करण्यासाठी सुविधा आणि जागा उपलब्ध करून दिल्या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६८(अ),(ब)८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समीर शांताराम कुलकर्णी, शेखर संभाजी साळुंखे,रामदास निवृत्ती पिसाळ, उमेश हनुमंत माने, सुहास विठ्ठल ओव्हाळ, राहुल रामचंद्र खंडाळे, विजय हंबीरराव मोहिते, जीवन वाल्मीक पिसाळ (सर्व रा. सातारा शहर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अजित बळीराम निकम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत.