सातारा : मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 20 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रताप सिंह नगर सातारा येथे तेथीलच संजय हरिश्चंद्र वाघमारे यांच्या खिशातून दारू पिण्यासाठी तीन हजार रुपये हिसकावून घेऊन तसेच वाघमारे यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी तेथीलच विजय गोरख ओव्हाळ, बाळासाहेब गोरख ओव्हाळ, संजय गोरख ओव्हाळ, धीरज लोंढे, सुरज लोंढे, सीताबाई ओव्हाळ, राजेश ओव्हाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये "आनंददायी शनिवार" उत्साहात साजरा
December 24, 2025
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा
December 24, 2025
सैदापूर येथे डंपरच्या धडकेमध्ये निवृत्त शिक्षकाचा मृत्यू
December 24, 2025