साताऱ्यात युवकास मारहाण प्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 August 2026


सातारा : एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांनी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 24 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुर्गा पेठ येथे गाडीचा इंडिकेटर का लावला नाही, या कारणावरून फैजूल्ला सादिक खान (रा. केसरकर पेठ) याला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी ऋषिकेश सिद्धेश्वर रोकडे आणि प्रथमेश सिद्धेश्वर रोकडे (दोन्ही रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सावकारकीच्या त्रासाला कंटाळून शाहूपुरीतील एकजण बेपत्ता; सहा जणांवर गुन्हा
पुढील बातमी
लिंब येथे आज (शनिवारी) सावता महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन

संबंधित बातम्या