नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
या चित्रपटात खऱ्या आयुष्यातील जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती आणि त्यामुळे या चित्रपटाबद्दलचा उत्साह अधिकच वाढला आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरनुसार कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या पात्राभोवती फिरते. प्रिया प्रेग्नन्ट असल्याचे दाखवले आहे तर दैनंदिन जीवनातील छोट्या गोष्टींमुळे तिच्या आणि उमेशमध्ये नोकझोकही दिसते. दरम्यान, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी मजा सुरू होते.
प्रिया काहीशी नाराज असल्याचेही दाखवले असून तिच्या नाराजीमागचं कारण, निवेदिता-गिरीश यांच्या अटी आणि या चौघांच्या नात्यांचा प्रवास कुठे नेणार, याची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत.
निवेदिता सराफ यांच्या पात्राच्या भूतकाळाचे संकेत ट्रेलरमध्ये दिसतात तर गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी जुगलबंदी रंगतदार ठरणार आहे. प्रिया-उमेशचा गोड संसार, या चौघांमधली संवादांची टक्कर आणि त्यातून उलगडणारे हशे आणि भावना हे प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचा ठेवा ठरणार आहे.
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. नात्यांची नवी सफर अनुभवायची असेल तर हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांनी बघायला हवा.
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे खऱ्या आयुष्यातील जोडपे असून, यापूर्वी त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. त्यामुळे या चित्रपटात त्यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.