सातारा : युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माहुली येथील विकासनगर परिसरात झालेल्या वादातून देवांश कुमार पासी व त्याचा साथीदार अंशू यांनी अक्षय अरुण खांडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. दारू पिण्याबाबत टोमणा मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर संशयितांनी अक्षय खांडेकर यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने हात, पाय आणि डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत.