सातारा : खाजगी सावकारकीच्या व्याज वसुलीतून एकाला वेळोवेळी दमदाटी व शिवीगाळ करून तसेच त्यांच्या आई-वडिलांकडून कोरे स्टॅम्प पेपर लिहून घेतल्याप्रकरणी महाबळेश्वर मध्ये तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रकांत धोंडीबा ढेबे, महादेव मुकुंद गोरे व संदीप बाबुराव आखाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत विठ्ठल ढेबे वय 22 राहणार सांगलीकर बंगला महाबळेश्वर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने चंद्रकांत ढेबे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये भावाच्या लग्नासाठी घेतले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी रोख, गुगल पे अशा पद्धतीने पाच लाख पाच हजार दोनशे रुपयांची परतफेड केली. तरी सुद्धा चंद्रकांत ढेबे, महादेव गोरे व संदीप आखाडे यांच्याकडून त्यांना व्याज वसुलीसाठी वेळोवेळी मारहाण व दमदाटी होत होती. तसेच संबंधितांनी त्यांच्या आई-वडिलांकडून कोर्या स्टॅम्प पेपर वर सह्या घेतल्या. फिर्यादीने या प्रकरणाची थेट पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार अधिक तपास करत आहेत.
महाबळेश्वरमधील तिघांवर खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा