सातारा : धमकी, दमदाटी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात राहणाऱ्या एका युवतीच्या दुचाकीस चारचाकी गाडी आडवी मारून तिला धमकी, दमदाटी केल्याप्रकरणी अलीम कादिर बागवान रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे करीत आहेत.