सातारा : राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सातारा व मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सातारा- जावली मतदारसंघातील हजारो रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवा वृद्धिंगत करण्याचा इतिहास घडवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
रक्तदान म्हणजेच जीवनदान..! महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'महारक्तदान' हा अनोखा उपक्रम सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्याच अनुशंगाने सातारा येथील कला व वाणिज्य कॉलेज (कोटेश्वर मैदानाशेजारी) आणि मेढा येथील जावली पंचायत समिती येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा- जावली भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले असून सातारा व मेढा येथील शिबीर स्थळी सातारा व जावली येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करावी, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.