सातारा : सातारा येथील सेव्हन स्टार इमारत परिसरात तलवार बाळगल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेवून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विजय बल्लाळ (वय २८, रा. एनकुळ, ता. खटाव) असे त्याचे नाव आहे.
याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवीण विजय बल्लाळ हा घरामध्ये शोपीस म्हणुन ठेवण्यात आलेली तलवार घेवून केक कापायला निघाला होता. दरम्यान, सातारा एसटी बसस्थानक येथील राधिका रस्त्यावर रात्रीच्यावेळी येताच त्याच्या हातातील तलवार इकडून तिकडे हवेत फिरवत असल्याचा धिंगाणा पाहून तात्काळ ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर त्या युवकाला तात्काळ ताब्यात घेतल्यानंतर पोलिस तपासातील माहितीनुसार हा युवक मतीमंद असल्यामुळे त्याने असे कृत्य केले आहे. याबाबत हवालदार चंद्रकांत लाड यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुर्यवंशी तपास करत आहेत.