वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

by Team Satara Today | published on : 01 May 2025


म्हसवड : माणगंगा नदीतून वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तीन ब्रास वाळू व डंपर असा 25 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद म्हसवड पोलिस ठाण्यात झाली आहे.

सोमनाथ आप्पा तोरणे (वय 32, रा. कुकुडवाड, ता. माण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. माणगंगा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून तोरणे याला पकडले.

यावेळी ट्रकची तपासणी केली असता तीन ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. सपोनि अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, जगन्नाथ लुबाळ, राहुल थोरात, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, होमगार्ड अजित शेळके, अक्षय गायकवाड यांनी ही कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड-पाटण मार्गावर दोन दुचाकींच्या धडकेत डॉक्टर ठार
पुढील बातमी
एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त

संबंधित बातम्या