सातारा : सातारा हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी दुपारी अडीच ते रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सातारा हॉस्पिटल परिसरातून ऋतुजा संजय पवार रा. शुक्रवार पेठ, सातारा यांची एक्टिवा दुचाकी क्र. एमएच 10 ईबी 6270 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
सातारा हॉस्पिटल परिसरातून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 09 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा