सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना रविवार पेठ येथील भाजी मंडई मध्ये फळकुट दादांकडून दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेचा सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी निषेध केला आहे. शेतकरी संघटना आणि शेतकरी किसान मंचच्यावतीने दिनांक 11 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये किसान विचार मंचचे म्हणजे राज्याध्यक्ष शंकरराव गोडसे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी हे त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करत असतात जर शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना अशी दमदाटी होत असेल तर हे चुकीचे आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात येणार आहेत. या बैठकीमध्ये शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समाजातील अपप्रवृत्तीतून अशा प्रकारची दमदाटी होत असेल तर त्याचा निषेध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी एकमुखाने करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.