सातारा : अपघातात दोन जणांना जखमी केल्याप्रकरणी चारचाकी चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मानेवाडी, ता. सातारा हद्दीत दुर्वांक सतीश वाघ रा. रामाचा गोट, सातारा हा त्याच्या मैत्रिणी सोबत दुचाकी क्रमांक एमएच 11 सीझेड 8105 वरून सज्जनगड ते सातारा असे येत असताना वैभव रवींद्र पावसकर रा. शुक्रवार पेठ, सातारा यांनी त्याच्या ताब्यातील जिप्सी भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवून दुर्वांक वाघ यांच्या मोटरसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात वाघ यांच्यासह त्यांची मैत्रीण जखमी झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026