मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिरालगत जुगार अड्ड्यावर छापेमारी

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा  : सातारा शहरातील मंगळवार पेठ, गुजर आळी, काशी विश्वेश्वर मंदिरालगत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी दिनांक २६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी जयंत बजरंग इनामदार (वय ६१ रा. मंगळवार पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मोरे करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवून मारामारी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा
पुढील बातमी
बोरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या