आयुर्वेदाचार्याने लढवली अनोखी शक्कल

पंढरपूरमध्ये लाखोंच्या एसयूव्ही ला शेणाचे लेपन

by Team Satara Today | published on : 28 March 2025


पंढरपूर : आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या गाईच्या शेणाचे लेपण एसयूव्ही गाडीला केले. गाडीतील तापमान नियंत्रित राहावे, शेण व गोमुत्राचे फायदे सर्वांना समजावे, यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची चकचकीत कारला शेणाचे लेपण करण्यात आले आहे, अशी माहिती आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी दिली. गोमुत्र आणि शेणाचे फायदे लोकांच्या लक्षात यावे, यासाठी हा प्रयोग केल्याचे पंढरपूर येथील रामहरी कदम यांनी सांगितले.

उन्हाचा पारा ४० अंशावर आला आहे. मात्र या उन्हातही दिवसभर गाडी उभी करूनही साधारण २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहिले. गाडीचे तापमान सुमारे ५० टक्के कमी होते. शेणामुळे शेतीपिके देखील चांगली येत असून, या देशी गाईचे महत्त्व नागरिकांना समजण्यासाठी पंढरपूरचे आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी १५ लाखांच्या कारला देशी गाईचे शेण व गोमुत्राचा लेप दिला आहे. यासह त्यांनी स्वतःच्या घराचे भिंतीला देखील शेणाचा लेप दिला आहे.

हा लेप दिल्यामुळे गाडी उन्हामध्ये गरम होत नसुन तापमान ५० टक्के कमी होते. गाडी खराब होत नसलेमुळे गाडी पुसण्यासाठी वेळ वाचतो. याचबरोबर गाडी दिसायला आकर्षक दिसत असल्यामुळे गाडी बघण्यासाठी गर्दी होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न होते. सिमेंटच्या भिंती असलेल्या घरालाही सारवले आहे. एसयूव्ही कारला संपूर्ण लिंपल्याने उष्णता कमी झाली.

५० किलो शेण, २५ लिटर गोमुत्राचा वापर केला. कारला संपूर्ण कारचे लेपण करून घेण्यासाठी ५० किलो शेण आणि २५ लिटर गोमुत्राच्या मिश्रणातून लेपन दिले गेले. सलग १८ तास काम करून स्वतः शेणाचा लेप गाडीला दिला. घराच्या सिमेंटच्या भिंती शेणाने सारवल्याने नैसर्गिक लूक घराचे तापमान नियंत्रित राहावे. याशिवाय ऑक्सिजनची पातळी वाढावी. समाजात गोमुत्र आणि गोबरचे फायदे समजावेत यासाठी सिमेंटच्या घराच्या भिंतीही शेणाने सारवल्या आहेत. त्यामुळे घराला नैसर्गिक लूक आल्याचे कदम म्हणाले.

शेणातून ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळत आहे. देशी गाईचे शेण जाळल्यानंतर ऑक्सिजन बाहेर पडतो. याचबरोबर शेती उत्पन्नातही वाढ होते. देशी गाईच्या शेणाचे आयुर्वेदिक महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोट्यवधी रुपयांचे वाहनचालकही माझी गाडी थांबून बघतात.

– रामहरी कदम, आयुर्वेदाचार्य, पंढरपूर


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अश्लील नृत्‍यांच्‍या कार्यक्रमांवर बंदी घाला
पुढील बातमी
आयर्लंड येथील कॉम्पिटिशन कॅम्प साठी सैफअली झारीची निवड

संबंधित बातम्या