सातारा : संपूर्ण देशात साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. पितृ लोकांचे स्मरण करीत हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि विविध धार्मिक वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी उन्हाळ्यात येत असलेल्या या सणाला आमरस खाण्याचाही विशेष योग असतो.
अक्षय तृतीयेनिमित्त जलदान तसेच आंब्याचे दान ही देण्याची प्रथा आहे. सातारा शहरातील पंचमुखी गणेश मंदिरात आंबा, अननस, संत्री, मोसंबी, केळी, श्रीफळ यासह विविध फळांची आरास करण्यात आली होती. तर यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्रीमुरलीधर मंदिरात फुलांची तसेच विविध सजावटीने हे मंदिर अतिशय सुरेखपणे सुशोभित करण्यात आले होते.