सातारा : अपशिंगे येथे आंबेडकर भवनच्या जवळ अनिल मोहिते यांच्या बंद घराच्या आडोशाला बोरगाव पोलिसांनी छापा टाकून देशी दारूच्या १६८० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या एकूण ४२ काचेच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आदित्य विनोद मोहिते (वय 20) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सुमित आनंदराव साळुंखे यांनी केली आहे.
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 06 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा