सातारा : वडूथ ता.सातारा गावच्या जत्रेत विना परवाना बॅन्जो लावल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजीत साबळे, सुहास साबळे, महेश साबळे (सर्व रा. आकले ता.सातारा), संतोष माने (रा.चिंचणेर वंदन ता.सातारा), चैतन्य भोसले (रा. फलटण), हणमंत जाधव (रा.पुणे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस शिवाजी वायदंडे यांनी तक्रार दिली आहे.
वडूथ ता. सातारा गावची दि. 12 मे रोजी यात्रा होती. यात्रेमध्ये चिंचणेर बॅन्ड चिंचणेर, श्रीराम बॅन्जो फलटण, हणमंत बॅन्जो सातारा यांनी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी स्वत: हून गुन्हा दाखल केला.