सातारा : मारहाण प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी कामाठीपुरा, सातारा येथे तेथीलच हरीश रत्नाकर निकोडे यांना लोखंडी रॉड, लाकडे दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच फिरोज बुद्रुद्दीन बोहरी, मुस्ताक बोहरी, मुफदर फिरोज बोहरी, फिरोज यांचा पुतण्या (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
दरम्यान, फिरोज बुद्रुद्दीन बोहरी यांनी दिलेल्या फिर्यादीत हरीश निकोडे यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.