साताऱ्यात गुरुवार पेठ परिसरात दुकानासमोर पार्क केलेल्या २० हजाराच्या दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 28 September 2026


सातारा : शहरातील गुरुवार पेठ परिसरात दुकानासमोर पार्क केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २२ जुलै रोजी रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत प्रवीण राजेश चव्हाण (वय ३१, रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. २७ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी गुरुवार पेठ येथे दुकानासमोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने व फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय दुचाकी चोरून नेली. या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पतीशी बोलल्याच्या रागातून शेजारी महिलेला शिवीगाळ; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
पुढील बातमी
भरधाव चारचाकीची दोन दुचाकींना धडक; तिघे जखमी, कारचालकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या