सातारा शहर परिसरातून बेपत्ता झालेल्या बालिकेचा अवघ्या 12 तासात शोध

सातारा शहर पोलिसांच्या अथक प्रयत्नाला आले यश

by Team Satara Today | published on : 29 June 2025


सातारा : सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एम.आय.डी.सी. परिसरातून दि. 29 जून रोजी एक 9 वर्षीय बालक (मुलगी) हि रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येवून त्याबाबत माहिती दिली. त्यावरून सातारा शहर पोलीस ठण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, पो. उपाधिक्षक (गृह) अतुल सबनीस, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शखाली तात्काळ सातारा शहर पोलीसांनी घटनास्थळी जावून चौकशी केली.

त्याबाबत सदरची मुलगी हि सायंकाळी 5:00 वा. सुमारास तिच्या राहत्या घरापासून एकटीच जात असताना दिसून आल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. ही मुलगी अवघ्या 9 वर्षाची असल्याने व एकटीच बाहेर पडल्याने व ती रात्री उशीर होवून देखील घरी न परतल्याने मुलीचे कुटुंबिय तसेच पोलीस देखील चिंतेमध्ये होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याचे 5 अधिकारी व 60 ते 70 पोलीस अंमलदार, डी.बी. पथकातील अधिकारी व गोपनीय अंमलदार यांची टिम तयार करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण रात्रभर एम.आय.डी.सी परिसरातील निर्जन ठिकाणे. बसस्टेशन, रेल्वेस्टेशन, झाडी झुडपे, आजूबाजूची शेती, विहीरी तसेच सुमारे 15 सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत संपूर्ण परिसर अहोरात्र पिंजून काढला होता.

दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दलाचे श्वान पथक, व 3 ड्रॉनद्वारे संपूर्ण भागामध्ये शोध मोहित राबवली होती. तसेच सोशल मिडीयावर संबंधित मुलगी हरवल्याबाबत माहिती प्रसारित केली होती. सातारा शहर पोलीस संपूर्ण रात्रीपासून पावसामध्ये दुपारपर्यंत न थकता तिचा शोध घेत होते. संबंधित मुलगी एका चाळीमधील परिसरात दिसून आल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सर्व पोलीस स्टाफ यांनी त्याठिकाणी जावून बालकाची चौकशी करीत असताना ती तिच्या शाळेतील एका मुलीच्या घरी दिसून आल्याचे समजले. पोलीस त्याठिकाणी गेले असता ती मुलगी तेथे खेळत असताना मिळून आली. व ती सुरक्षित असल्याने मुलीच्या कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले होते. मुलीकडे चौकशी केली असता ती घरामध्ये कोणासही न सांगता तिच्या ओळखीच्या मैत्रिणीकडे गेली होती. व तिने मैत्रिणीच्या घरातील लोकांना मी आईला सांगून खेळण्यासाठी व राहण्यासाठी आली असल्याचे सांगितले होते.

सातारा शहर पोलीसांनी या संवेदनशिल घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सर्व उपाययोजना करून संबंधित मुलीचा अहोरात्र न थकता शोध घेतला. त्यामुळे तात्काळ माहिती प्राप्त झाली व ती सुखरूप मिळून आल्याने सातारा शहर पोलिसांनी केलेले प्रयत्न पाहून स्थानिक नागरिक, मुलीच्या कुटूंबियांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के व त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून आभार मानले.

या कारवाईत पोलीस अधिक्षक सो. तुषार दोषी. अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, पो. उपधिक्षक (गृह) अतुल सबनीस. वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी समाधान बिले, ए.एस. कांबळे, अशोक सावंजी, सुधीर मोरे, अनिल जायपत्रे, शामराव काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस अंमलदार श्रीनिवास घाडगे, राहुल घाडगे, अनिल सावंत. पंकज मोहिते, विक्रम माने, तुषार भोसले, निलेश जाधव, अजिंक्य माने, दिपक गुरव, दिपक ताटे, चालक भोसले, बनकर, तोडकर, महेंद्र पाटोळे, महेश देशमुख, दिपक इंगवले, पवार, इम्रान मेटकरी, समीर महांगडे, धनाजी यादव, म. सहा.पो. फौजदार अनुमुले, महिला पोलीस नाईक पद्मिनी जायकर, देखणे, सागर गायकवाड. सुहास कदम, राहुल फडतरे, सुशांत कदम, विशाल धुमाळ, निलेश यादव, सुजीत भोसले तसेच इतर अंमलदार व स्थानिक रहिवाशी यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किल्ले रायरेश्वर कडे जात असताना पर्यटकाचा मृत्यू
पुढील बातमी
विकासनगर येथे 65 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या