रहिमतपूर, दि. ११ : सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या भूमी संपादनाच्या जाचक आणि अन्यायकारक प्रक्रियेमध्ये न्याय देत ५ पट मोबदला मिळवून देत इतिहास रचणाऱ्या व सातारा जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांचे विश्वासू सहकारी व रेल्वे लढ्याचे मुख्य प्रवर्तक विकास थोरात (तारगाव) यांना शिर्डी येथे क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य यांचा क्रांतीसुर्य पुरस्कार विकास थोरात यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके,राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.प्रभावती घोगरे, मराठा आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू खंडू आण्णा सातपुते आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विकास थोरात यांनी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या भूमी संपादनाच्या जाचक आणि अन्यायकारक प्रक्रियेमध्ये न्याय देत ३०० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवून देण्यात यश मिळवले. तसेच शेतकऱ्यांना रेल्वे लाईन- शेजारून रस्ते, पाईप लाईन क्रॉसिंग, झाडे, घरे,विहीर,बोअरवेल या सर्व बाबींच्या मोबदल्यासह इतर सुविधा मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळवून दिला आहे.