सातारा : सातार्यातील सागर डिलक्स हॉटेलमध्ये युवतीवर इच्छेविरुध्द अत्याचार करुन अश्लील फोटो कुटुंबियांना दाखवण्याची भिती दाखवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी राहूल गुप्ता (रा.मुलुंड वेस्ट, मुंबई) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 19 वर्षीय पिडीत युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना मे 2023 ते 28 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीला संशयित राहूल गुप्ता याने युवतीशी मैत्री केली. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये युवतीला फिरायला आणल्यानंतर सातार्यातील राधिका रोडवरील सागर डिलक्स हॉटेलमध्ये नेले. त्यावेळी संशयित राहूल याने युवतीला जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. युवतीने त्याला नकार दिला. मात्र संबंध न ठेवल्यास आत्महत्या करेन, असे म्हणत ब्लॅकमेल केले व युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केले. या घटनेची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा