सातारा : खंडणी, मारहाण प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड जवळील दत्त मंदिर रिक्षा स्टॉप येथे जिलेबी चा मांडव घालण्याच्या कारणावरून उमेश अरुण त्रिंबके रा. मल्हार पेठ, सातारा यांना 5000 ची खंडणी मागून, मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी गिरीश खंदारे, श्री खंदारे, आकाश उर्फ गोट्या खंदारे, अथर्व खंदारे, निलेश खंदारे आणि इतर दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
दरम्यान, गिरीश महादेव खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महेश अरुण त्रिंबके, उमेश त्रिंबके, चाणक्य उमेश त्रिंबके आणि उमेश त्रिंबके यांचे तीन मित्र यांच्या विरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.