सातारा : चित्रपट, नाटक, मालिका विश्वात तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे बाळकृष्ण शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐंशीव्या स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट रोजी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला.
बाळकृष्ण शिंदे यांचा पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्यकरणीवर पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याचा मानस आहे. या पक्ष प्रवेशा सोबत डॉ. मधुकर माने कराड यांचाही पक्ष प्रवेश झाला. तसेच अल्पसंख्याक विभागावर हाजरा शिकलगार यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आणि तबस्सुम मुल्ला यांची शहर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
यावेळी सुषमा राजेघोरपडे, रजनी पवार, धनश्री महाडिक, नाजीम इनामदार, राजेंद्र शेलार, जगन्नाथ कुंभार, संजय तडाखे, अजित पाटील, प्रदीप जाधव, बाबासाहेब कदम, महेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, प्रवक्ते हनुमंत पवार, सांस्कृतिक प्रदेश अध्यक्ष अक्षय शिंपी, निमिष साने या मान्यवरांनी बाळकृष्ण शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अभिनंदन केले.