सातारा : सदर बझार परिसरातून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 ऑक्टोबर दरम्यान प्रवीण वसंतराव शिंदे (रा. कांगा कॉलनी, सदर बझार, सातारा) यांची पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 50 बी 5881 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
सदर बझार परिसरातून दुचाकीची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा