03:05pm | Nov 12, 2024 |
सातारा : काही लोकांना निवडणूक आली की, मतदारसंघातील जनतेची आठवण होते. खोटा कळवळा आणून हे लोक वाट्टेल तशा तोंडाच्या वाफा फेकत असतात. काहीही झालं तरी मतदारसंघातील जनता विरोधकांच्या भूलथापांना भुलणार नाही. मी कायम जनतेसाठी उपलब्ध असतो. सातारा- जावलीतील जनतेचा आशीर्वाद माझ्याच पाठीशी असून जनता मला विक्रमी मतांनी निवडून देईल, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, सातारा शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी आणि सातारकरांनी केला.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु असून मंगळवारी सकाळी समर्थ मंदिर, बोगदा, पापाभाई पत्रेवाले, रविंद्र ढोणे घर, खारी विहीर, महेश महाडिक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, विश्वेश्वर चौक, गुजर आळी, कात्रेवाडा, हेडगेवार चौक, रमेश जाधव दुकान, चांदणी चौक ते राजवाडा अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत शिवेंद्रराजेंच्या समवेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी - माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
सातारा शहरातील विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावून असंख्य विकासकामे मार्गी लावली आहेत. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सातारा शहराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी एक व्हिजन तयार असून आगामी काळात त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे त्या- त्या गावात विकासकामे झाली आहेत. जनतेचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मी नेहमीच विश्वासाला पात्र राहून काम केले आहे. विरोधकांनी कितीही भूलभुलैया करण्याचा प्रयत्न केला तरी, जनतेचा मलाच पाठिंबा आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. कोणीही गाफील न राहता उच्चांकी मतदान होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेनी केले.
बुधवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता तालिमखाना, फुटका तलाव, औताडे घर, एकता चौक, गोलमारुती चौक, सुपनेकर घर, दत्त मंदिर, फुटका तलाव, मारवाडी चौक अशी पदयात्रा, सायंकाळी ७.३० वाजता सतीश रावखंडे घर, जयभवानी नवरात्र उत्सव मंडळ गुरुवार पेठ, एल.बी. एस. कॉलेज जवळ आणि रात्री ९ वाजता काशी विश्वेश्वर चौक, मंगळवार पेठ येथे कोपरा सभा होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |