सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत 15 सप्टेंबर रोजी विशेष बैठक

उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा :  'सेवा पंधरवडा' यांचा प्रभावी प्रसार करण्यासाठी आणि सातारा जिल्यात महसूल विभागाच्या विविध जनहितकारी उपक्रमांचा प्रसार आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असलेल्या इन्फ्लुएन्सर्स यांची  विशेष बैठक सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सातारा जिल्ह्यातील सोशल मीडिया  इन्फ्लुएन्सर्स यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी संवादाचे माध्यम बनले आहे. या माध्यमाचा उपयोग करून महसूल विभागाच्या उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचवणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना या बैठकीस उपस्थित रहावे तसेच   इन्फ्लुएन्सर्स यांनी  QR वर आपली माहिती भरुन आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदर्श शिक्षक सन्मान पुरस्काराने श्री. काशिनाथ सोनवलकर यांचा गौरव
पुढील बातमी
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार

संबंधित बातम्या