राज्यातील १४२ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

by Team Satara Today | published on : 03 September 2026


नागपूर : राज्यातील १४२ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (एपीआय) बदल्या करण्यात आल्या. यात नागपूर शहर आणि ग्रामीणमधील एपीआयंचाही समावेश आहे. आज सायंकाळी जाहीर झालेल्या बदल्यांमध्ये नागपूर शहरात कार्यरत रामेश्वर दत्तराव कांडोरे यांची नांदेड परिक्षेत्रात बदली झाली.
कुणाल दिगंबर धुरट यांची नागपूर शहरातून नागपूर परिक्षेत्रात, लोहमार्ग पोलिस दलाला संलग्न असलेल्या प्राची गोरख तोडकर यांची पिंपरी-चिंचवड येथे, अर्चना तुकाराम गाढवे यांची लोहमार्ग नागपूर येथून नाशिक परिक्षेत्रात, शहर पोलिस दलातील ओमप्रकाश यशवंत भलावी यांची लोहमार्ग नागपूर येथे, संजय पांडुरंग बनसोडे यांची नाशिक परिक्षेत्रात, मुंबईच्या पूनम धनंजय शिरसाट यांची नागपूर लोहमार्ग येथे आणि नागपूर ग्रामीणच्या भाग्यश्री कुलकर्णी यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तू डिजेच्या विरोधात बोलतो का? म्हणून सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापटांवर हल्ला; नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली
पुढील बातमी
अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना सुनावले

संबंधित बातम्या