सातारा : जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा या कार्यालयातील वापरात नसलेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) जसे असेल त्या स्थितीत जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. सदर जडसंग्रह वस्तू (फर्निचर) चा लिलाव गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालय, सातारा येथे ठेवण्यात आला आहे.
लिलावात भाग घेण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत: लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी अर्धा तास आगोदर जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा येथे हजर रहावे. लिलावात भाग घेतलेल्या व यशस्वी झालेल्या व्यक्तीस लिलावाची पूर्ण रक्कम त्याच दिवशी जिल्हा न्यायालयात जमा करावी लागेल. लिलावाची पूर्ण रक्कम भरले नंतरच लिलाव कायम करणेचे आदेश पारित करण्यात येतील. लिलाव प्रक्रिये दरम्यान निर्माण होणाऱ्या शंकाबाबत निर्णय घेणेचे पुर्ण अधिकार सक्षम प्राधिकारी आणि लिलाव समितीस राहील, असे जिल्हा न्यालयातील प्रबंधक यांनी कळविले आहे.