दसऱ्यानिमित्ताने सातारा शहरातील वाहतुकीमध्ये बदल; सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांची माहिती

वाहतूक विभागाची माहिती कमानी हौद ते देवी चौक येथे वाहनांना प्रवेश बंद

by Team Satara Today | published on : 02 October 2025


सातारा : दि.  2 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने सातारा शहरातील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने वळवण्यात आलेली आहे सकाळी 10 ते दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी सात या दरम्यान दुर्गा विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने ही वाहतूक कळवण्यात आली आहे.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी ही माहिती दिली आहे. राजपथ ते मोती चौक यादरम्यान कमानी हौदापासून गोल बागेकडे येणारा रस्ता वाहनांना बंद करण्यात आला आहे .कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौकाकडे येणारा रस्ता बंद आहे . स्टेट बँक प्रतापगंज पेठ सातारा डीसीसी बँक मोती तळेपर्यंत येणारे रस्ते वाहनांना बंद करण्यात आले आहेत . विठोबाचा नळ ते जलमंदिर हा रस्ता सुद्धा वाहनांना बंद आहे मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे रस्ते वाहनांना बंद करण्यात आले आहेत .

बोगदा समर्थ मंदिर ते शाहू चौक हा मार्ग हलके वाहन व अवजड वाहनांसाठी बंद राहील . सातारा शहरातून सज्जनगड कास पठाराकडे जाणारी व येणारी सर्व वाहने ही गोडोली नाका शिवराज पेट्रोल पंप खिंडवाडी शेंद्रे सोनगाव फाटा बोगदा मार्गे जातील मोळाचा ओढा येथून सातारा शहरात येणारी सर्व वाहने मोळाचा ओढा महानुभाव मठ करंजे भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील .कास यवतेश्वर सज्जनगड सोनगाव फाटा मार्गे सातारा शहरात येणाऱ्या वाहनांनी शेंद्रे खिंडवाडी शिवराज पेट्रोल पंप मार्गे सातारा शहरात यावे .बोगदा ते शाहू चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे . कोटेश्वर मंदिर राधिका टॉकीज चौक राधिका रोड मार्ग एसटी स्टँड कडे येणारी वाहने कोटेश्वर मंदिर शाहूपुरी मोळाचा ओढा मार्गे महानुभाव मठ करंजे भूविकास बँक मार्गे एसटी स्टँड कडे येतील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 1 हजार रुपयांची मदत ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे धनादेश सुपूर्द
पुढील बातमी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

संबंधित बातम्या