सातारा : वाढेफाटा येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथील बसथांब्याच्या जवळ 55 ते 60 वयाच्या अनोळख्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत खेड, ता. सातार्याचे पोलीस पाटील दिनेश कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.
वाढेफाटा येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
by Team Satara Today | published on : 08 November 2024