उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून थेट वारकऱ्यांच्या पंगतीत; पवारांच्या साधेपणाने वारकरी अचंबित

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सोलापूर : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी दुपारी पंढरपुरातील वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून थेट सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांच्या पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष प्रणिता भालके या उपस्थित होत्या.

दरम्यान, पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुनेत्रा पवार या शनिवारी पंढरपुरात दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांनी वारकरी भक्त निवासाच्या कामांचे उदघाटन केले. त्यानंतर भक्त निवासामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सामान्य वारकऱ्यांप्रमाणे वारकरयांच्या पंक्तीत बसून जेवण केले. पवारांच्या साधेपणाने वारकरी अचंबित झाले.

विठ्ठल मंदिरातील जीर्णोद्धार आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी पवार यांनी केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. शिवाय आषाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामांची माहितीही दिली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्यासह अन्य अधिकारी व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारळी नदीवरील नवीन पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; दहा गावांचा संपर्क तुटला
पुढील बातमी
माहिती अधिकारातील बदल रद्द न झाल्यास पुन्हा जनआंदोलन उभारावे लागेल; अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा

संबंधित बातम्या