डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या

लगेच मिळेल आराम

by Team Satara Today | published on : 02 December 2024


हिवाळ्याचा कडाका आता चांगलाच जाणवायला लागला आहे. महाराष्ट्रात तर कित्येक ठिकाणी तापमान १० डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी आहे. त्यामुळेच अगदी दिवसाही अंगात स्वेटर घालून बसावं लागत आहे. या थंडगार वातावरणाचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना. उबदार कपडे घालायला, कानाला रुमाल बांधायला किंवा टोपी घालायला मुलं नाही म्हणतात. पायात सॉक्स घालणं त्यांना आवडत नाही. यामुळे मग थंडीचा त्रास होतो आणि चटकन सर्दी- खोकला होतो. सर्दी- खोकल्याचा त्रास वाढू नये म्हणून आई- वडील त्यांना लगेचच औषध- गोळ्या देतात.  पण असं वारंवार औषधं देणं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणूनच अशावेळी औषध- गोळ्या टाळून कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयी डॉक्टरांनी स्वत:च सांगितलेली ही माहिती 

मुलांना सर्दी- खोकला झाल्यावर त्यांना घरच्याघरी आयुर्वेदिक पद्धतीने काय औषध देता येऊ शकतं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी mylittlemoppet_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

डॉक्टर सांगतात की हा उपाय करण्यासाठी एक चमचा तूप घ्या. त्या तुपामध्ये दोन लवंगा आणि एक किंवा दोन मिरे टाका. ते तुम्ही अखंड टाकले तरी चालतील किंवा थोडे ठेचून घेतले तरी चालतील.

तूप गरम करा. त्याला हलकासा चॉकलेटी रंग आल्यावर गॅस बंद करा. यामुळे लवंग आणि मिऱ्यांचा अर्क तुपामध्ये उतरेल. तूप थोडं कोमट झालं की त्यातले लवंग, मिरे काढून ते मुलांना प्यायला लावा.

मुलं थोडी मोठी असतील तर ते लवंगाचे तुकडे चावूनही खाऊ शकतात. हा उपाय दिवसातून एकदा करा. सलग ३ दिवस हा उपाय केल्यास मुलांची सर्दी, खोकला, छातीत जमा झालेला कफ बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्रिपदासाठी अमित शाह यांनी मागवले रिपोर्ट कार्ड
पुढील बातमी
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा : शंभूराज देसाई

संबंधित बातम्या