मुंबई : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य शासनाने याप्रकरणी अभ्यासासाठी निवृत्त न्यायमूर्ती बदर समिती नेमली होती. 16 मार्च 2026 या समितीने रोजी शासनाकडे सोपवलेल्या अहवालावर दोन महिन्यांत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे, मातंग समाजाने आक्रमक धोरण जारी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्याने मातंग समाजाने मुंबईत आंदोलन छेडले आहे. मुंबईतील आझाद मैदानात सकल मातंग समाजाकडून आंदोलन केले जात आहे. अनुसूचित जातींमधील अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात मुंबईत मोर्चा काढला असून याबाबत शासन निर्णय जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा मातंग समाजाने दिला आहे.
दरम्यान, मातंग समाजाकडून मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता. परिणामी या परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून वातावरण अधिक तापले होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत काही आंदोलनकांना ताब्यात घेतल्याचे समोर आले.
आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले असून या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतीही हानी न होण्यासाठी तसेच परिस्थितीवर नियंत्रणासाठी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सहा महिने उलटूनही शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मुंबईत मातंग समाज आक्रमक; उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा