सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याप्रकरणी एका युवकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी रात्री संबंधित महिला घरात असताना आरोपीने प्रथम खिडकीतून घरात डोकावले. त्यानंतर तो थेट बेडरूममध्ये शिरून महिलेचा विनयभंग केला. महिला ओरडू लागल्यानंतर आरोपीने तिला धमकावत घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी ५५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रोशन सुरेश घोरपडे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.