कुरिअर बॉयला लुटणाऱ्याच्याआवळल्या मुसक्या; सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई, संशयित पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 22 November 2025


सातारा  : ऑनलाइन पार्सल मागवून ते आल्यानंतर कुरीयर बॉयकडून ते चोरी करुन पळून गेलेल्या चोरटयास सातारा पोलिसांनी  शिताफीने ताब्यात घेऊन त्याने चोरी केलेले पार्सल व मोटारसायकल जप्त करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. अजिंक्य बाबासाहेब डांगे (वय-२०, मूळ रा. चिंचणेर, निंब, सध्या रा. समर्थनगर, सातारा) असे याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव असून सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  शुक्रवारी (दि. २१ रोजी) एका कुरीयर कंपनीमधून सुमारे ३ हजार रुपये किंमतीचे कपडयाचे ऑनलाईन आलेले पार्सल दिलेल्या पत्यावर देण्यास एक कुरीअर बॉय गेलेला होता. सदर पत्याच्या आसपास गेल्यानंतर त्याने कंपनीचे फोनवरून पार्सल मागवण्याऱ्या व्यक्तिस फोन केला. व त्यास तुम्ही दिलेल्या पत्याच्या आसपास मी आलेलो आहे. तेथून पुढील पत्ता विचारला त्यावर पार्सल मागवणाऱ्या व्यक्तिने मी पुण्याला असून पार्सल घेण्यासाठी माझे मित्राला पाठवितो असे सांगितले. थोडया वेळानंतर एक हुडी घालून मोटारसायकलवरून एक युवक त्याचा चेहरा दिसणार नाही असा पद्धतीने आला. कुरीअर बॉय कुरीयरबाबत बीलाचे संभाषण करत असताना त्या युवकाने गाडीवर ठेवलेले पार्सल घेवून तो तेथून पळून गेला. कुरीयर बॉयने लगेच पार्सल मागवणारे युवकास फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर त्याने मी अजून कोणत्याच मित्राला पार्सल नेण्यासाठी फोन केलेला नाही. ते पार्सल कोणीतरी अन्य व्यक्तीने चोरी केले असलेचे कुरीयर बॉय यास वाटले. त्यामुळे त्याने सातारा शहर पोलीस ठाणेत येवून घडलेल्या प्रकाराबाबतची तक्रार दिली.

त्यानंतर सदरचा युवक हा कष्ट करणारा व गरीब असल्याने त्यास कंपनीला पैसे भरपाई पोटी दयावे लागणार किंवा कामावरून काढण्याच्या भीतीने तो चिंतेत होता. त्याने सदर घडलेला प्रकार हा रडत रडत सांगत असताना सातारा शहर पोलीस ठाणेचे राजेंद्र मस्के व पोलीस ठाणेतील कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांनी त्यास धीर देत सदर चोरी करणाऱ्या इसमास आम्ही पकडून सदरचे पार्सल तुला मिळून देतो असे सांगितले.

त्यानंतर श्री. मस्के यांनी तात्काळ डी. बी. पथकास सदर आरोपी शोध घेवून त्यास ताब्यात घेण्याबाबत सुचना केल्या. त्याप्रमाणे डी.बी. पथकाने घटनास्थळी जावून तेथील पाहणी करून संशयित युवकाची माहिती प्राप्त केली. त्याचा शोध घेत असताना तो मूळ चिंचणेर निंबचा व गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेबाबत माहिती प्राप्त झाली. परंतू तो गावामध्ये राहण्यास नसून तो सातारा शहरात नक्की कोठे राहतो याबाबत माहिती नसल्याचे स्थानिक रहिवाशी यांनी सांगितले. सदर युवकाचा विविध ठिकाणी गोपनीय माहितीचे आधारे शोध घेतला असता तो एमआयडीसी सातारा येथे काही टवाळखोर मुलांमध्ये बसायला असतो असे समजलेवर काही संशयितांना ताब्यात घेवून त्याची अधिक माहिती प्राप्त करून त्यास ताब्यात घेतले.

सदर युवकाकडे चौकशी करीत असताना तो सदरचे पार्सल मी मागवले नव्हते, माझा नंबर कोणीतरी बोगस वापरलेला आहे. तसेच मी माझ्या कोणत्याही मित्राला पार्सल आणण्यासाठी पाठविले नाही. माझ्या नावाचा व नंबरचा कोणीतरी दुरूपयोग केला आहे असे सांगू लागला. परंतु, पोलीसांनी त्याचेकडे कसोशीने चौकशी केल्यानंतर त्याने सदरचे पार्सल मीच चोरी केले असल्याचे सांगितले. पोलीसांनी ते पार्सल जप्त केलेले आहे. सदरची चोरी पोलीसांनी काही तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. संबंधित तक्रारदार व कुरीयर कंपनी यांनी श्री. मस्के व सातारा शहर डी. बी. पथक व सातारा शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे आभार मानले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. डॉ. वैशाली कडूकर, सातारा उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो. कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. प्रकाश कांबळे यांना पीएचडी प्रदान
पुढील बातमी
महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ गांधी मैदानावर फुटणार; दि. २५ रोजी खा. अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन, विजयाचे रणशिंग तुतारीच्या माध्यमातून फुंकले जाणार

संबंधित बातम्या