सातारा : येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे.
सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण व्हावे आणि या कॉलेज व रुग्णालयातील सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यातूनच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मेडिकल कॉलेज, रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. नुकतीच यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सातारा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा लाभ सातारा जिल्ह्यातील रुग्णांना झाला पाहिजे. यासाठी हे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय तातडीने सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठीच राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगतिले.
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याने सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३.५० कोटी मंजूर
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा