विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पतीसह अन्य महिलेवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 May 2025


सातारा : विवाहितेचा जाचहाट करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी पती व एका महिलेवर  सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश शंकर जाधव व एका महिलेविरुध्द सौ.सावित्री रमेश जाधव (दोघे मूळ रा. विजापूर, सध्या रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. पतीने लग्नानंतर 4 तोळे स्त्री धन व 30 हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. तसेच माहेरहून आणखी पैसे आण असे म्हणत जाचहाट केला. संशयित रमेश जाधव व त्याच्यासोबत अन्य एका महिलेने जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेच्या विभयभंग प्रकरणी तीनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या