सातारा : सातार्यातील राधिका रोडवरील बंद बंगला फोडून चोरट्याने रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत अधिक माहिती अशी, राजन हरकचंद मामणिया (वय 57, रा. राधिका रोड, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2 ते 3 ऑगस्ट या दरम्यान घडली आहे. तक्रारदार यांचा विश्वम नावाचा बंगला असून ते हॉटेल मालक आहेत. बंगला बंद असल्याने चोरट्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरुन मागील बाल्कनीचा दरवाजाचे लॉक तोडून बंगल्यात प्रवेश केला. यानंतर बेडरुममधील लॉकर मधील सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करीत आहेत.